‘कौन बनेगा करोडपती’ शो झाला डिजिटल

kaun banega crorepati digital esakal news
kaun banega crorepati digital esakal news

~सर्वात मोठा रिअॅलिटी गेम शो सोनीलिव्हच्यासाथीने आता स्मार्टफोनवरही खेळता येणार ~

मुंबई : सोनी लिव्हच्या माध्यमातून केबीसीचे नववे पर्व आता पहिल्यांदा ऑनलाइन प्रसारित होणार असून पदार्पणाआधीच हा कार्यक्रम सर्वाधिक प्रायोजक मिळविणारा डिजिटल दुनियेतला पहिला मोलाचा ऐवज ठरला आहे. हा कार्यक्रम सोनीलिव्हवर लिनियर फीडवर सबस्क्रीप्शन +  व्हीओडी मोडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना कधीही आणि कुठेही आपल्या बुद्ध्यांकाची चाचणी घेता येईल.

केबीसीने या डिजिटल आवृत्तीसाठी भारतातील ७ सर्वात मोठे ब्रँड्स प्रायोजक म्हणून करारबद्ध करून घेतले आहेत. या क्षेत्रामध्ये हा आकडा विक्रमी मानायला हवा. भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील बहुचर्चित ब्रँड जिओने सोनीलिव्हवर या कार्यक्रमाचा सादरकर्ता प्रायोजक बनायचे ठरवले आहे. याशिवाय भारताचे सर्वात मोठे आणि सर्वात विश्वासार्ह मोटारविक्रीस्थळ ड्रूमडॉटइन हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. पतंजली या आयुर्वैदिक ब्रँडचेही प्रायोजकत्व या शोला लाभले असून कार्यक्रमाच्या चालकपदी डॅटसन कंपनी असणार आहे. गुजरात पर्यटन या कार्यक्रमाचे सहाय्यक प्रायोजक असणार आहेत. केबीसीचे पर्यटन सहकारी बनण्याची जबाबदारी इजमायट्रिपडॉटकॉमने उचलली असून, फॉर्च्युन व्हिवो डायबेटीस केअर ऑइल या कार्यक्रमाच्या स्वास्थ्याकडे लक्ष पुरविणार आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे इव्हीपी आणि डिजिटल व्यवसाय प्रमुख उदय सोधी यांनी सांगितले की, “कौन बनेगा करोडपतीने गेमशोसाठीच्या प्रेक्षक संख्येत क्रांतीकारी वाढ केली. यावर्षी डिजिटल प्रेक्षकांना सामील करून घेत या कार्यक्रमाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आणखी वृद्धिंगत करावा असे आम्ही ठरवले. या कार्यक्रमाला जाहिरातदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे व भारताचे सात सर्वात मोठे ब्रँड्स या निमित्ताने डिजिटल मंचावरूनही आपली जाहिरात करत आहेत. सोनी लिव्हवर केबीसीची सुरुवात झाल्यापासून या अॅपच्या डिजिटल प्रेक्षकवर्गामध्ये वेगाने वाढ झाली आहे व त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील सोनी लिव्हचे स्थान आणखी पक्के झाले असून सगळ्यात विविधरंगी मनोरंजन हवे तर इथेच भेट द्यायला हवी हे समीकरण त्यांच्या मनात दृढ झाले आहे.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com