कियारा अडवानीचा 'मशीन' 1 आठवडा आधीच चित्रपटगृहांत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अब्बास-मस्तान यांनी आतापर्यंत बाजीगर, अजनबी, रेस आणि रेस-2 असे हिट चित्रपट दिले आहेत.

मुंबई- अभिनेत्री कियारा अडवाणी आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा मुस्तफा यांची प्रमुख भूमिका असणारा 'मशीन' हा चित्रपट नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा आधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचं निर्मात्यांनी ठरवलं आहे. 

निर्मात्यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार 'मशीन' 24 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र तो आता 17 मार्च रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
अब्बास-मस्तान या प्रसिद्ध जोडीतील दिग्दर्शक अब्बास बर्मावाला यांचा मुलगा मुस्तफासाठी 'मशीन' हा लाँचपॅड ठरणार आहे. कियाराने आतापर्यंत एम.एस. धोनी, फगली या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

आतापर्यंत अब्बास-मस्तान यांनी बाजीगर, अजनबी, रेस आणि रेस-2 असे हिट चित्रपट दिले आहेत. ट्विस्ट असणारी प्रेम कहाणी ही या दिग्दर्शक द्वयींची खासीयत आहेत. 'मशीन'ची कहाणी अशाच प्रकारची असल्याचे सांगण्यात आले.

मनोरंजन

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार याचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असतानाच त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने...

02.12 PM

मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं...

08.33 AM

मुंबई : श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017