किंग खान म्हणणार "कतरिना मेरी जान' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग खान शाहरूख "कतरिना मेरी जान' म्हणणार, हे वाचून जरा गडबडलात ना! हे एका चित्रपटाचे शीर्षक आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग खान शाहरूख "कतरिना मेरी जान' म्हणणार, हे वाचून जरा गडबडलात ना! हे एका चित्रपटाचे शीर्षक आहे. आनंद एल. राय बऱ्याच कालावधीपासून शाहरूख खानसोबत चित्रपट बनवण्याची योजना आखत होते; मात्र या दोघांचा सर्वांत जास्त वेळ नायिका नक्की करण्यातच गेला. या चित्रपटात दोन नायिका आहेत. दीपिका पदुकोण, आलिया भट, श्रद्धा कपूर यांच्यासारख्या बऱ्याच अभिनेत्रींचा विचार करण्यात आला; पण शेवटी कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार "कतरिना मेरी जान' असे या चित्रपटाचे नाव आहे. यात शाहरूख कतरिनाचा चाहता असून तो "कतरिना मेरी जान' असे म्हणताना दिसेल.