किरणला बनवायचाय बायोपिक 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण राव एक चांगली निर्माती अन्‌ लेखक आहे. "धोबीघाट' चित्रपटातून तिनं आपलं दिग्दर्शकीय कौशल्यही दाखवून दिलं होतं. अभिनेता राहुल बोसच्या "पूर्णा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला ती नुकतीच हजर राहिली होती. तेव्हा तिनं गौहर जान या गायिकेवर चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. गौहर जान यांनी भारतीय संगीताच्या इतिहासात 1902 मध्ये पहिल्यांदा ग्रामोफोनवर रेकॉर्डिंग केलं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी प्रकाराच्या त्या जनक मानल्या जातात. "पूर्णा' चित्रपटाचं कौतुक करताना किरण म्हणाली, "" "पूर्णा'चा बायोपिक खूपच मनोरंजक आहे.

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण राव एक चांगली निर्माती अन्‌ लेखक आहे. "धोबीघाट' चित्रपटातून तिनं आपलं दिग्दर्शकीय कौशल्यही दाखवून दिलं होतं. अभिनेता राहुल बोसच्या "पूर्णा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला ती नुकतीच हजर राहिली होती. तेव्हा तिनं गौहर जान या गायिकेवर चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. गौहर जान यांनी भारतीय संगीताच्या इतिहासात 1902 मध्ये पहिल्यांदा ग्रामोफोनवर रेकॉर्डिंग केलं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी प्रकाराच्या त्या जनक मानल्या जातात. "पूर्णा' चित्रपटाचं कौतुक करताना किरण म्हणाली, "" "पूर्णा'चा बायोपिक खूपच मनोरंजक आहे. काही बायोपिक हयात असलेल्या माणसांवर बनविले जातात. बहुतांश बायोपिक मात्र सेवानिवृत्त किंवा मृत व्यक्तींवर आधारित असतात. कर्तृत्ववान व्यक्तींवरील बायोपिक पाहणं नेहमीच रोमांचकारी असतं. म्हणूनच बायोपिकना लोकप्रियता मिळते. माझीही बायोपिक बनविण्याची इच्छा आहे. खूप वर्षांपासून मी गौहर जान यांच्यावर चित्रपट बनविण्याचा विचार करत आहे. मी त्याची पटकथाही लिहीत होते; पण काही कारणानं त्यात खंड पडला. एक मात्र नक्की की गौहर जान यांच्यावर चित्रपट आला तर तो खूपच खास असेल.'' 
 

Web Title: Kiran Rao wants to make biopic