खाऊगल्ली: अंडे नसलेला साजुक तुपातील केक

खाऊगल्ली: अंडे नसलेला साजुक तुपातील केक

तुम्हाला जमणारी आणि तुमची आवडती पाककृती (रेसिपी) पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रेसिपी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ‘ई-सकाळ‘च्या बोरिवली, मुंबई येथील वाचक दीप्ती जोशी यांनी पाठविलेली रेसिपी

साहित्य
100 ग्रॅम मावा, 130 ग्रॅम मैदा, 140 ग्रॅम पिठीसाखर, 35 ग्रॅम साजुक तूप, 80 ग्रॅम दही, पाऊण छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, चिमूटभर केशर, चिमूटभर मीठ
 

कृती

  • केक ठेवण्याअगोदर ओव्हन 180 डिग्री सेल्सियस तापमानावर 10 मिनिटे गरम होऊ द्यावा.
  • पेपरच्या वाट्या (कप) कपकेकच्या साच्यात घालून तयार ठेवावेत.
  • मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करून चाळून घ्यावं.
  • साखर, तूप आणि मावा एका भांड्यात घेऊन फेटावे.
  • हे मिश्रण चांगले हलके झाले की त्यात दही, वेलची पावडर आणि केशर घालावे.
  • परत एकदा फेटून घ्यावे. आता ह्यात मैद्याचे मिश्रण मिसळावे.
  • अगदी हलक्‍या हाताने, मैद्याचे मिश्रण दह्याच्या मिश्रणात हलक्‍या हाताने एकत्र करावे.
  • आता हे तयार मिश्रण पाऊण कप भरतील इतके प्रत्येक पेपरकपमध्ये भरावे.
  • हा साचा ओव्हनमध्ये मध्यभागी ठेवावा.
  • वीस मिनिटांनी चेक करावे. छोटीशी लाकडाची काडी मधोमध खोचून बघावी.
  • काडीवर ओलसर मिश्रण लागले तर आणखी पाच मिनिटे बेक करावेत.
  • जर काडी कोरडी बाहेर आली तर ओवन बंद करून केक बाहेर काढावेत.
  • लोखंडाच्या किंवा स्टीलच्या जाळीवर काढून थंड करावेत.

टीप

  • हा केक लहान मुलांना खूप आवडेल. ह्या केकमध्ये अंडे किंवा बटर वापरलेले नाही.
  • हा केक खूप हलका, चविष्ठ आणि तोंडात ठेवता क्षणीच विरघळणारा आहे.
  • हा केक चार ते पाच दिवस टिकत असल्याने सुट्टीत कुठे फिरायला जाताना, गावाला जाताना किंवा सहलीला जाताना उपयुक्त ठरेल.
  • याशिवाय हा केक एखाद्याला गिफ्टही देता येऊ शकेल.

---

तुम्हीही तुमचा आवडता पदार्थ (रेसिपी) शेअर करू शकता. 

  • तुमची रेसिपी webeditor@gmail.com या ई-मेलवर पाठवा.
  • रेसिपीसोबत आवश्‍यक साहित्य, कृती असावी. छायाचित्र व्हिडिओ असल्यास सोबत अवश्‍य जोडा.
  • सब्जेक्‍ट बॉक्‍समध्ये My Recipes असे लिहा.
  • ई-मेलमध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांकही आवर्जून नमूद करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com