कृती सेनॉन झळकणार "बरेली की बर्फी' चित्रपटात 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉन सध्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. "बरेली की बर्फी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा आवडल्याने आपण हा चित्रपट करत असल्याचे कृतीने सांगितले. हा चित्रपट 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

कृती सेनॉन म्हणाली, "बरेली की बर्फी' चित्रपटाची कथा फारच वेगळी आहे. ही कथा नीतेश तिवारीने लिहिली आहे. त्यांची पत्नी अश्‍विनी अय्यर तिवारी दिग्दर्शिका आहेत. त्यांनी या चित्रपटाची कथा चांगल्याप्रकारे लिहिली. मला ही कथा वाचायला खूप मजा आली. यात मी उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या शहरातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून, दोन किंवा तीन गाण्यांचे चित्रीकरण बाकी आहे.' "बरेली की बर्फी' या चित्रपटात कृती सेनॉनसोबत आयुषमान खुराना व राजकुमार रावदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.