ऑस्कर नामांकनात 'ला ला लॅंड'ची बाजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लॉस एंजलिस : यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये "ला ला लॅंड' या सांगीतिक चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने 14 नामांकने मिळविली असून, "टायटॅनिक' आणि "ऑल अबाउट ईव्ह' या चित्रपटांच्या सर्वाधिक नामांकनाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

लॉस एंजलिस : यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये "ला ला लॅंड' या सांगीतिक चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने 14 नामांकने मिळविली असून, "टायटॅनिक' आणि "ऑल अबाउट ईव्ह' या चित्रपटांच्या सर्वाधिक नामांकनाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

"मूनलाईट' या चित्रपटाला आठ नामांकने मिळाली आहेत. एका कृष्णवर्णीय व्यक्तीची कथा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. उत्कृष्ट चित्रपटासाठी "अरायव्हल', "ला ला लॅंड', "मूनलाईट', "मॅंचेस्टर बाय द सी', "लायन', "फेन्सेस', "हेल ऑर हाय वॉटर', "हिडन फिगर्स' आणि "हॅकसॉ रिज' यांना नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मेल गिब्सन, डॅमियन चॅझेल, डेनिस व्हिेन्यूव्ह, बेरी जेकिन्स आणि केनेथ लोनरेगन यांना नामांकन मिळाले आहे.

उत्कृष्ट अभिनेत्यासाठी रायन गोसलिंग, व्हिगो मोर्टनसेन, अँड्य्रू गारफिल्ड, केसी अफ्लेक, डेन्झेल वॉशिंग्टन यांना नामांकन मिळाले आहे. सहायक अभिनेत्यासाठी महेरशाला अली, जेफ ब्रीजेस, लुकास हेजेस, देव पटेल, मायकेल शॅनॉन यांना नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रुथ नेगा, इसाबेल हुपर्ट, एमा स्टोन, नताली पोर्टमन आणि मेरील स्ट्रीप यांना नामांकन मिळाले आहे. सहायक अभिनेत्रीसाठी व्हायोला डेव्हिस, नाओमी हॅरीस, निकोल किडमन, ऑक्‍टाव्हिया स्पेन्सर, मिशेल विल्यम्स यांना नामांकन मिळाले आहे.

मनोरंजन

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017