गोल्डन ग्लोबवर "ला ला लॅंड'ची छाप..!

Ryan Gosling and Emma Stone
Ryan Gosling and Emma Stone

बेव्हर्ली हिल्स (कॅलिफोर्निया) - "ला ला लॅंड' या बहुचर्चित चित्रपटाने तब्बल सात "गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळवित नवा विक्रम रचला आहे. किंबहुना "दिग्दर्शन, पटकथा, संगीत' अशा ज्या ज्या क्षेत्रांत या चित्रपटास नामांकन मिळाले, त्या सर्व क्षेत्रांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली.

या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेल्या एमा स्टोन व रायन गोसलिंग या अभिनेत्यांनीही गोल्डन ग्लोबवर नाव कोरण्यात यश मिळविले. ला ला लॅंडशिवाय "मूनलाईट' या चित्रपटानेही "बेस्ट ड्रामा पुरस्कार' मिळविण्यात यश मिळविले.

याचबरोबर, "टीव्ही' प्रकारांत ब्रिटीश अभिनेत्यांनी वरच्ष्मा कायम राखला. दी नाईट मॅनेजर आणि दी क्राऊन या मालिकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनाही गोल्डन ग्लोबने गौरविण्यात आले. "हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन'तर्फे गोल्डन ग्लोब पुरस्कार घोषित केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com