चलो हंपी : सोनाली कुलकर्णी, ललित, प्राजक्ताशी #LIVE गप्पा

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

होय, आत्ता टीम हंपीसोबत लाईव्ह गप्पा सुरू आहेत. यात सहभागी आहेत सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर. दिग्दर्शक प्रकाश कुंटेही आहेच. त्यांना तुम्ही थेट मनातले प्रश्न विचारू शकता. त्यामुळे पटकन बातमीत असलेल्या या फेसबुक लाईव्हवर क्लिक करा आणि शेअर करा. 

पुणे : प्रकाश कुंटे दिग्दर्शित हंपी हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काॅफी आणि बरंच काही, अॅंड जरा हट के असे सिनेमे देणारा दिग्दर्शक प्रकाशचा हा पुढचा सिनेमा आता चर्चेचा असणार आहे. सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हंपीची ही टीम आली आहे लाईव्ह गप्पा मारायला. 

हंपी टीमसोबत लाईव्ह गप्पा पहा... 

हा चित्रपट म्हणजे स्वत:च स्वत:कडे पाहाणं आहे, असा दावा दिग्दर्शक करतो. सोनालीचा टाॅम बाॅईश लूक, प्राजक्ताचा हाॅट पण स्वीट लूक या चित्रपटाचं आकर्षण आहे. सोबत ललित प्रभाकर आणि प्रियदर्शन जाधव ही मंडळीही सरप्राईज पॅकेज असणार आहे. या चित्रपटाच्या टीमशी ई सकाळच्या फेसबुक पेजवरून ई सकाळच्या प्रेक्षकांनी लाईव्ह गप्पा मारायला सुरूवात केली आहे. तुम्हीही विचारा मनातले प्रश्न.