रिव्ह्यू Live : शेंटिमेंटल: खाकी वर्दीच्या व्यथेची खुसखुशीत कथा

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 28 जुलै 2017

ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये शेंटिमेंटल चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू करण्यात आला. दिग्दर्शक समीर पाटील, अभिनेते रमेश वाणी, विकास पाटील, सुयोग गोऱ्हे ही मंडळी यावेळी उपस्थित होती. कॅमेरामन महेश लिमये यांनीही या रिव्ह्यूमध्ये भाग घेतला. समीक्षेनंतर कलाकारांनीही त्यांची बाजू मांडली. या चित्रपटाला ई सकाळने दिले 3 चीअर्स. 

पुणे : पोस्टर वाॅईज, पोस्टर गर्ल या चित्रपटांनंतर समीर पाटील यांनी शेंटिमेंटल हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. दोन चित्रपटांनतर पोलीस हा विषय निवडून वर्दीतल्या माणसाच्या भावना मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात दिसतो. अर्थातच या सिनेमाचा मोठा भार अभिनेते अशोक सराफ यांनी उचलला आहे. सोबत उपेंद्र लिमये, विकास पाटील ही मंडळीही आहेत. या सिनेमातून सुयोग गोऱ्हे हा नवा चेहरा लोकांना दिसेल. 

शेंटिमेंटल रिव्ह्यू : Live

मुंबईतल्या अंधेरीतल्या एका पोलिस स्टेशनकडे चोरीचं एक प्रकरण येतं. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस गुन्हेगाराला घेऊन बिहार गाठतात आणि त्यातून हा सिनेमा घडतो. या चित्रपटाचा विषय करड्या शिस्तीचा पोलीस असा असला तरी पोलिसांचे प्रश्न, त्यांची मानसिकता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू ई सकाळने पुण्यात केला. यावेळी चित्रपटाची टीम उपस्थित होती. 

चित्रपट खुसखुशीत झाला आहे. यात व्यथाही मांडल्या गेल्या आहेत. पण त्याचवेळी हा सिनेमा ज्या चोरीच्या प्रकरणामुळे सुरु होतो, त्याचे धागेदोरे उत्तरार्धात आणखी पेरले गेले असते, तर हा चित्रपट अधिक रंगतदार झाला असता. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत 3 चीअर्स. हे 3 चीअर्स एेकताच सर्वांनी जल्लोष केला.