'लव्ह लग्न लोचा'ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

'लव्ह लग्न लोचा' या मालिकेतील 'सौम्या' म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी कॅमेरामन भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

मुंबई : 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेतील 'सौम्या' म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी कॅमेरामन भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

अक्षया ला लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली  , "एका मित्राच्या घरी झालेली ओळख ते आयुष्यभराचा जोडीदार मिळणे, हा प्रवास फारच सुंदर होता . भूषणचा काळजी घेण्याचा स्वभाव व माझ्यासाठी असलेला त्याचा वेडेपणा  आणि मुख्य म्हणजे  एकाच इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा त्याने माझ्या कामाचे महत्व  समजून घेणे आणि सपोर्ट करणे मला मनापासून भावले. " अक्षयाने नुकतेच तिचे मेहंदीचे , हळदीचे आणि लग्नाचे फोटो सध्या तिच्या सोशल मीडिया वर अपलोड केले तेव्हा तिच्या फॅन्सना याची बातमी कळली. 

अक्षयाने मराठी सिनेमा " फेकम फाक " मध्ये काम केलं होत . त्याच बरोबर छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून ती झळकली होती. सध्या ती 'झी युवा'वरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमधे सौम्या ही भूमिका करत आहे .भूषणने अनेक जाहिरातींचा कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.