आदर्श महिलेची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

विशेष म्हणजे मधुरा खऱ्याआयुष्यात घरात स्वयंपाक करीत नाही. पण या मालिकेसाठी तिने स्वयंपाकही शिकून घेतला आहे.

अभिनेत्री मधुरा नाईक लवकरच 'तू सूरज, मैं सांझ पियाजी' या मालिकेमध्ये प्रवेश करणार आहे. यात ती एका आदर्श महिलेची भूमिका साकारताना दिसेल.

आपल्या व्यक्तिरेखेविषयी मधुरा म्हणाली, ''पालोमी ही एक आदर्श महिला असते. ती उमाशंकरच्या आश्रमात त्याच्या कुटुंबीयांसमवेत राहते. यात मी प्रथमच भारतीय महिलेच्या वेशात दिसणार आहे. आतापर्यंत मी आधुनिक महिलेच्याच भूमिका साकारल्या होत्या.''

विशेष म्हणजे मधुरा खऱ्याआयुष्यात घरात स्वयंपाक करीत नाही. पण या मालिकेसाठी तिने स्वयंपाकही शिकून घेतला आहे.