'सरस्वती', 'अस्सं सासर सुरेखबाई' आणि 'घाडगे & सून' मध्ये नवे वळण !

टीम ई सकाळ
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कलर्स मराठीवर येत्या रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबरला सरस्वती, घाडगे & सून आणि अस्सं सासर सुरेख बाईचे एका तासाचे महाएपिसोड प्रक्षेपित होणार आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट बघायला मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका या तिन्ही मालिकांचे महाएपिसोड फक्त कलर्स मराठीवर संध्या. ७ वाजल्यापासून.   

मुंबई  : कलर्स मराठीवर येत्या रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबरला सरस्वती, घाडगे & सून आणि अस्सं सासर सुरेख बाईचे एका तासाचे महाएपिसोड प्रक्षेपित होणार आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट बघायला मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका या तिन्ही मालिकांचे महाएपिसोड फक्त कलर्स मराठीवर संध्या. ७ वाजल्यापासून.   
 
नुकत्याच सुरु झालेल्या घाडगे & सून या मालिकेमध्ये प्रेक्षक अक्षय आणि अमृताच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, हे लग्न होणार कि नाही ? अमृता अक्षयशी लग्न करेल कि नाही अशी चर्चा सुरु असतानाच  अखेर लग्न पार पडले. माईंच्या सांगण्यावरून अक्षयने हे लग्न केले, परंतु अमृताला हे लग्न करायचे नव्हते, परंतु तिच्या या निर्णायाला तिच्या वडिलांकडून देखील पाठिंबा मिळाला नाही त्यामुळे अमृता आपल्या वडिलांवर नाराज आहे. अमृताने आपल्या वडिलांची अखेर भेट देखील घेतली नाही आणि ती घाडग्यांच्या घरी निघून गेली, अमृताच्या अश्या वागण्यामुळे प्रभुणे आणि घाडगे परिवाराला धक्का बसला. अमृता नाराज आहे, ती लग्नाच्या विरोधात आहे हे सगळ खरं असूनही तिने घाडग्यांच्या घरात ती दाखल झाली. पण, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक अमृता घरातून गायब झाल्यामुळे माई, अक्षय, सगळेच घाबरले. अक्षय आणि अमृताचे बाबा अमृताला शोधायला बाहेर पडले आणि तिला सुखरूप घरी घेऊन देखील आले. पण ज्यांनी अमृताला घाडग्यांच्या घरी आणले त्या माईचं आता अमृताच्या विरोधात आहेत, घाडगेंच्या घरात तुला स्थान नाही असे माईंनी तिला खडसावून सांगितले. तसेच अक्षयने अमृताला शब्द दिला आहे कि तो तिला लवकरच या सगळ्या बंधनामधून मोकळ करेल. त्यामुळे आता माई अमृताला घरात येऊ देतील ? जर अमृता घरात आली तर ती घरच्यांचं आणि माईंचं मनं जिंकू शकेल ? माई अमृता आणि अक्षयचा घटस्फोट होऊ देतील ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा घाडगे & सूनचा एका तासाचा महाएपिसोड.  
 
सरस्वती मालिकेमध्ये देविका आणि सरस्वती या चांगल्या मैत्रिणी झाल्या असून, सरस्वती देविकाची वेळ पडल्यास बरीच मदत देखील करते त्यामुळे देविकाच्या मनामध्ये सरस्वतीबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. विद्युलला मात्र हि मैत्री पटत नाहीये. याचदरम्यान मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली असून त्याचे नाव भुजंग असे आहे. विद्युल भुजंगच्या मदतीने सरस्वती आणि देविका मध्ये असलेली मैत्री मिटविण्याच्या प्रयत्नात असतानाच भुजंगला राघव आणि सरस्वतीच्या लग्नाची पत्रिका हाती लागते आणि ती तो देविकाला दाखवतो. इतके दिवस भैरवकरांनी देविकापासून लपवलेले सत्य तिच्यासमोर भुजंग आणतो कि सरस्वती या घरची सून म्हणजेच राघवची बायको आहे आणि हे कळताच देविकाला प्रश्न पडतो कि, सरस्वतीने इतके महत्वाचे सत्य तिच्यापासून का लपवले ? आता हे सत्य कळल्यावर राघव, सरस्वती आणि देविका यांच्या नात्यामध्ये नक्की कुठले वादळ येईल ? सरस्वती कशी देविकाची समजूत काढेल ? सरस्वती कशी या संकंटातून बाहेर येईल ? हे प्रेक्षकांना येत्या रविवारच्या महाएपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे. अस्सं सासर सुरेख बाई मालिकेमध्ये दिग्विजयच्या मदतीने जुईला तिच्या वैयक्तिक आयुष्यात तसेच व्यवसायात देखील मदत होते. पण, जेंव्हा हि गोष्ट जुईला कळते तेंव्हा दिग्विजयच हे मदत करण तिला आवडत नाही, आणि तिच्यापासून दूर रहाण्याचा सल्ला ती त्याला देते. याप्रसंगामधूनच जुई आणि दिग्विजयमध्ये मैत्रीची सुरुवात होणार का ? दिग्विजय जूईच मनं जिंकू शकेल का ? हे बघणे रंजक असणार आहे.
 
तेंव्हा बघा येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबरला सरस्वती, अस्सं सासर सुरेख बाई आणि घाडगे & सून एका तासाचे महाएपिसोड फक्त कलर्स मराठीवर.