कालीच्या भूमिकेत पूजा 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

अभिनेत्री पूजा शर्मा हिने "महाकाली... अंत ही आरंभ है' या पौराणिक मालिकेमध्ये कालीची भूमिका साकारली आहे.

यासाठी पूजाने कालीमातेच्या विविध रूपांविषयी तसेच हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाविषयी विविध पुस्तके व लेखांचे वाचन केले. याबद्दल पूजा म्हणाली, ""मला देवी कालीविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती महाकाली मालिकेने दूर केल्या आहेत.

काली ही पार्वतीचाच एक अवतार असल्याचे मला नंतर समजले. देवीविषयी लोकांच्या मनात असलेले प्रेम अन्‌ अनेक गोष्टींची माहिती झाली. विशेष म्हणजे मला या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळणार आहेत. एका बाजूला मी काली म्हणून दिसणार आहे, तर दुसरीकडे पार्वतीसुद्धा असणार आहे. त्यामुळे ही भूमिका रंगविण्यासाठी मी उत्सुक आहे.''