बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरमध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री!

रविवार, 15 एप्रिल 2018

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे. कार्यक्रमाच्या सेटपासून, स्पर्धक यांच्याबद्दल बरीच गुप्तता राखली जात आहे. पण आज संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे.

मुंबई - करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला आणि संपूर्ण भारतामध्ये वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस मराठीतून येत आहे. आज 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर संध्या. 7 वाजता सोम ते शनि रात्री 9:30 वा तसेच रविवारी 9:00 वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. हा कार्यक्रम येत आहे, हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे. कार्यक्रमाच्या सेटपासून, स्पर्धक यांच्याबद्दल बरीच गुप्तता राखली जात आहे. पण आज संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार असून, यामध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. तसेच स्पर्धकांची नावे देखील प्रेक्षकांना कळणार आहेत.

महेश मांजरेकर ओ राजे, दे धक्का आणि बिग बॉसचे सध्या गाजत असलेल्या शीर्षकगीतावर परफॉर्मन्स करणार आहेत. याचे नृत्यदिग्दर्शन प्रतिक उतेकर याने केले आहे. शीर्षकगीतामध्ये महेश मांजरेकर यांचा कधी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना मिळत आहे आणि आता बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला देखील असाच वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे यात शंका नाही. स्टेजवर काच ब्रेक करून धमाकेदार डान्सची सुरवात करणार आहेत.

Mahesh Manjarekar

बिग बॉसच्या घरामध्ये नक्की कोण कोण असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना बऱ्याच महिन्यांपासून होती. 15 स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये 15 एप्रिलला एन्ट्री करणार आहेत. त्यामुळे आता येणारे 100 दिवस ते कसे एकत्र राहतील, त्यांच्यामध्ये काय काय होईल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत यात शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी - किस्से असो हे विषय लोकांच्या दैनंदिन आयुष्यात मध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

बिग बॉसच्या घरामधील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकरांची भांडणं असो, प्रेम असो वा मैत्री असो... घरामध्ये असलेल्या कलाकारांची सुख-दु:ख सुध्दा प्रेक्षकांनी आपलीशी केली. फक्त कलाकारच नव्हे तर सामान्य माणसांमधून आलेल्या स्पर्धकांना देखील प्रेक्षकांनी तितकेच प्रेम दिले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या मराठी बिग बॉसवर देखील प्रेक्षक असेच प्रेम करतील ही आशा आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Mahesh Manjrekars Big Entry in Big Bosss Grand Premier