'रईस'मधून माहिरा खानची गच्छंती?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

मुंबई - फवाद खान पाठोपाठ आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या रईस चित्रपटातील भूमिकेला कात्री लागण्याची शक्यता आहे.

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करु देण्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला होता. 

‘ए दिल है मुश्कील‘ चित्रपटातील फवाद खानच्या भूमीकेला कात्री लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आता माहिरा खानलाही शाहरुख खानच्या ‘रईस‘ या चित्रपटातून काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान फवाद खान आणि माहिरा खान यांच्या भूमीका असलेल्या सिनेमांना विरोध होत असताना त्या दोघांनीही भारत सोडून मायदेशा परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, या दोघांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रीयाही दिली, मात्र तरीही भारतात या दोघांनी काम करण्याला विरोधच होत आहे.