आता पाहायला मिळणार 'अगडबम' दंगल!

टीम ई सकाळ
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

तृप्ती भोईर यांनी काही वर्षांपूर्वी अगडबम आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या रंगभूषेची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आपण अगडबम 2 हा चित्रपट करू अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्याला काही वर्षे लोटल्यानंतर आता हा दुसरा भाग यायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आला असून, यात आपल्याला अगडबम स्टाईलची कुस्ती पाहायला मिळणार असे दिसते आहे.

मुंबई : तृप्ती भोईर यांनी काही वर्षांपूर्वी अगडबम आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या रंगभूषेची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आपण अगडबम 2 हा चित्रपट करू अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्याला काही वर्षे लोटल्यानंतर आता हा दुसरा भाग यायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आला असून, यात आपल्याला अगडबम स्टाईलची कुस्ती पाहायला मिळणार असे दिसते आहे.

अगडबम 2 चा ट्रेलर पाहा

या चित्रपटात सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर आणि तृप्ती भोईर यांच्या भूमिका आहेत. घरात निर्माण झालेली अडचण निस्तरण्यासाठी ही नायिका थेट आंतरराष्ट्रीय पैलवानांशी पंगा घेते असे याचे स्वरूप आहे. या चित्रपटाचे नाव माझा अगडबम असे ठेवण्यात आले असून, याचे दिग्दर्शनही तृप्ती यांचे आहे.