मेकिंग आॅफ सैराट लवकरच प्रकाशित होणार

टीम इ सकाळ
सोमवार, 26 जून 2017

हा सिनेमा नेमका कसा बनला, त्याची काय तयारी केली गेली.. सिनेमातल्या कलाकारांचे कास्टिंग नेमके कसे झाले हे सगळे सांगणारी एक डाॅक्युमेंटरी लवकरच प्रकाशित होणार आहे. नागराज मंजुळे यांनीच ही माहिती दिली. 

पुणे: सैराट चित्रपट प्रदर्शित होऊन महिने लोटले तरीही सिनेमाची आणि त्यात काम करणार्या कलाकारांची क्रेझ काही कमी होत नाही. लोकांना आजही आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना भेटायचे असते. हा सिनेमा नेमका कसा बनला, त्याची काय तयारी केली गेली.. सिनेमातल्या कलाकारांचे कास्टिंग नेमके कसे झाले हे सगळे सांगणारी एक डाॅक्युमेंटरी लवकरच प्रकाशित होणार आहे. नागराज मंजुळे यांनीच ही माहिती दिली. 

सध्या पुण्यात सुरू असलेल्या बालगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. सध्या याचे काम सुरु असून येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होईल. आणि त्यानंतर हा  सिनेमा आम्ही नेमका कसा बनला हेही सांगण्यात येणार आहे.