मुंबईची प्रभावी राणी 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

गुडमॉर्निंग मुंबईऽऽऽ काहीतरी आठवलं ना? रोज सकाळी सकाळी अख्खी मुंबई जिचा आवाज ऐकते ती मुंबईची राणी आर. जे. मलिश्‍का म्हणजेच मलिश्‍का मेंडोसाला या वर्षी इम्पॅक्‍टचा 50 मोस्ट इन्फ्लुएन्शल वूमन इन मीडिया हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. गेल्या 12 वर्षांपासून मलिश्‍का आपल्या आवाजाने मुंबईला ताजेतवाने ठेवतेय. ती कोणत्याही विषयावर अगदी सहजपणे आणि सच्चेपणाने बोलू शकते. तिचा मॉर्निंग नं.1 हा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम मानला जातो. ती आपल्या आवाजाने संपूर्ण मुंबईला आपलेसे करते. लोकांशी भरभरून गप्पा मारते. त्यांच्या समस्यांवर काही हटके फंडे सांगून त्यांना खूश करते आणि बरेच काही.

गुडमॉर्निंग मुंबईऽऽऽ काहीतरी आठवलं ना? रोज सकाळी सकाळी अख्खी मुंबई जिचा आवाज ऐकते ती मुंबईची राणी आर. जे. मलिश्‍का म्हणजेच मलिश्‍का मेंडोसाला या वर्षी इम्पॅक्‍टचा 50 मोस्ट इन्फ्लुएन्शल वूमन इन मीडिया हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. गेल्या 12 वर्षांपासून मलिश्‍का आपल्या आवाजाने मुंबईला ताजेतवाने ठेवतेय. ती कोणत्याही विषयावर अगदी सहजपणे आणि सच्चेपणाने बोलू शकते. तिचा मॉर्निंग नं.1 हा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम मानला जातो. ती आपल्या आवाजाने संपूर्ण मुंबईला आपलेसे करते. लोकांशी भरभरून गप्पा मारते. त्यांच्या समस्यांवर काही हटके फंडे सांगून त्यांना खूश करते आणि बरेच काही. त्यामुळे मलिश्‍काला हा पुरस्कार तिच्या या आतापर्यंतच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.