होय, भारतात लैंगिक भेदाभेद आहे - मल्लिका शेरावत

सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

तुम्हाला भारतात रहायचं असेल तर लैंगिक भेदाभेद खूप आहे, त्याला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला जगताच येत नाही. एका पाॅइंटपर्यंत तुम्हाला हा स्ट्रगल करावा लागतो अशा स्पष्ट शब्दात आपली मतं मांडलीत ती मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने. 

मुंबई : तुम्हाला भारतात रहायचं असेल तर लैंगिक भेदाभेद खूप आहे. त्याला तोंड द्यावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला जगताच येत नाही. एका पाॅइंटपर्यंत तुम्हाला हा स्ट्रगल करावा लागतो अशा स्पष्ट शब्दात आपली मतं मांडलीत ती मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने. 

एका मासिकाला मुलाखत देताना तिने आपलं मत मांडलं. ती म्हणाली, मी एका अशा कुटुंबातून आले आहे जिथे महिलांना आपल्या पायावर उभंही राहू दिलं जात नाही. त्यांना नोकरीही करू दिली जात नाही. त्यामुळे मला भारतातल्या पुरुषी मानसिकतेची पूर्ण कल्पना आहे. भारतात राहायला काहीच अडचण नाही. पण तुम्हाला पक्षपातीपणा सहन करावा लागतो. स्त्रीयांनी दुय्यम मानलं जातं. इथे मोठा भेदाभेद दिसतो. ' मल्लिकाच्या या मतामुळे अद्यााप काही वाद उद्भवलेला नाही. मात्र सोशल मीडियावर तिला तिच्या चित्रपटांची आठवण करून देत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र झाला.