मल्लिकाचा जीनत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

"ख्वाइश', "मर्डर'फेम मल्ल्लिका शेरावत काही वर्षांपासून हॉलीवूड चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये काम करत होती; पण अनेक वर्षांच्या गॅपनंतर ती आता बॉलीवूडमध्ये परत येतेय. ती दिग्दर्शक संदेश बी. नायक यांच्या चित्रपटातून कमबॅक करतेय आणि या चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. "जीनत' असे या चित्रपटाचे नाव आहे. मल्लिकाने बॉलीवूडमध्ये फारच निवडक प्रोजेक्‍टस्‌ केलेत. तिचा हा "जीनत' चित्रपट फारच स्पेशल असणार आहे. संदेश बी. नायक यांचा हा बॉलीवूडमधला दुसराच चित्रपट आहे. या आधी त्यांनी "लव शगुन' हा चित्रपट केला होता.

"ख्वाइश', "मर्डर'फेम मल्ल्लिका शेरावत काही वर्षांपासून हॉलीवूड चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये काम करत होती; पण अनेक वर्षांच्या गॅपनंतर ती आता बॉलीवूडमध्ये परत येतेय. ती दिग्दर्शक संदेश बी. नायक यांच्या चित्रपटातून कमबॅक करतेय आणि या चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. "जीनत' असे या चित्रपटाचे नाव आहे. मल्लिकाने बॉलीवूडमध्ये फारच निवडक प्रोजेक्‍टस्‌ केलेत. तिचा हा "जीनत' चित्रपट फारच स्पेशल असणार आहे. संदेश बी. नायक यांचा हा बॉलीवूडमधला दुसराच चित्रपट आहे. या आधी त्यांनी "लव शगुन' हा चित्रपट केला होता. मल्लिका शेरावतने या चित्रपटाबद्दल सांगितले की, मी या चित्रपटाची कथा किंवा माझ्या भूमिकेबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. अजून चित्रपटाच्या अन्य कलाकारांची निवड व्हायचीय. या चित्रपटाचे वर्कशॉप नुकतेच सुरू झालेय आणि चित्रीकरण लवकरच मुंबईत सुरू होईल. हा चित्रपट एक सोशल ड्रामा आहे, जो आजच्या रिलेशनशिपवर भाष्य करणारा आहे. मी नेहमीच माझ्या भूमिकांबद्दल सिलेक्‍टिव्ह होते. जीनत ही माझ्यासाठी खूपच स्पेशल फिल्म आहे. 
 

Web Title: mallika sherawat zeenat upcoming movie