बिझी नवाज!

बिझी नवाज!

नवाजुद्दीन सिद्दीकी या वर्षी खूपच बिझी होता. त्याचे चार-पाच चित्रपट प्रदर्शित झाले. अजूनही त्याच्याकडे अनेक प्रोजेक्‍ट्‌स आहेत. त्याचा आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच चित्रित झाला होता; पण तो प्रदर्शित होत नव्हता. आता नवाज फोटोग्राफर रितेश बत्रा यांच्या आगामी चित्रपटासाठी आणि नेटफ्लिक्‍स सीरिज ‘स्केअर्ड गेम्स’साठी शूटिंग करतोय. त्याचे शेड्युल इतके टाईट आहे की तो २४ तास कामच करतोय बिचारा. कारण त्याला हे दोन्ही प्रोजेक्‍ट्‌स लवकरात लवकर संपवून नवीन काम करायचे आहे. या सगळ्या गोंधळात त्याच्याकडे ‘मॉन्सून शूटआऊट’च्या प्रमोशनसाठी वेळच उरलेला नाही. कारण त्याला सध्या करत असलेल्या प्रॉजेक्‍ट्‌ससाठी परदेशातही जावे लागणार आहे. नवाजुद्दीन खूप प्रोफेशनल आहे. त्याचे शेड्युल आधीपासून ठरलेले असल्यामुळे त्याच्या तारखा बदलून त्याला प्रमोशनसाठी जाणे योग्य वाटत नाहीय. नवाजच्या या बिझी शेड्युलमुळे त्याच्या मॉन्सून शूटआऊट या चित्रपटाचा गल्ला रिकामा तर राहणार नाही ना! अशी निर्मात्यांना भीती वाटू लागलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com