बॉलीवूडचे पटेल आणि पंजाबी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

अभिनेता ऋषी कपूर आणि परेश रावल बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र आलेत. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता हे दोघे इतक्‍या वर्षांनंतर पहिल्यांदा ‘पटेल की पंजाबी शादी’ या सिनेमात झळकणार आहेत. या चित्रपटात परेश रावलने गुजराती आणि ऋषी कपूरने पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारलीय. याबाबत ऋषी कपूर म्हणाले की, हा चित्रपट स्वीकारण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे यातील माझा रोल आणि दुसरं म्हणजे परेश रावलसोबत काम करण्याची संधी. यापूर्वी आम्ही दोघांनी काम केलेलं आहे. ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलं होतं.

अभिनेता ऋषी कपूर आणि परेश रावल बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र आलेत. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता हे दोघे इतक्‍या वर्षांनंतर पहिल्यांदा ‘पटेल की पंजाबी शादी’ या सिनेमात झळकणार आहेत. या चित्रपटात परेश रावलने गुजराती आणि ऋषी कपूरने पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारलीय. याबाबत ऋषी कपूर म्हणाले की, हा चित्रपट स्वीकारण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे यातील माझा रोल आणि दुसरं म्हणजे परेश रावलसोबत काम करण्याची संधी. यापूर्वी आम्ही दोघांनी काम केलेलं आहे. ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलं होतं. त्यामुळे त्या वेळी मला परेश रावलला दिग्दर्शित करायला मिळालं होतं. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटाची कथा पंजाबी मुलगा व गुजराती मुलीच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमात चटपटीत लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला खूप चांगली पसंती मिळाली असून यात जबरदस्त विनोदाची मेजवानी मिळणार आहे. हा सिनेमा १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017