कार्बन - एक अनोखी कथा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, जॅकी भगनानी आणि अभिनेत्री प्राची देसाई पहिल्यांदाच एकत्र आले आहेत ते ‘कार्बन’ या लघुपटाच्या निमित्ताने. रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्‍ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्रस्तुत आणि मैत्रेय बाजपाय आणि रमीज इल्हाम खान दिग्दर्शित ‘कार्बन’ लघुपटाची कथा २०६७ सालातील आहे.

ऑक्‍सिजनची कमतरता आणि वातावरणातील वाढत्या कार्बनमुळे उद्‌भवणारी परिस्थिती यात दर्शवण्यात आलीय. आपल्या दुर्लक्षामुळे वाढलेल्या कार्बनकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या लघुपटामधून करण्यात आलाय. वेळीच दक्षता न घेतल्यास ५० वर्षांनंतर ऑक्‍सिजन हा एक विक्रीयोग्य प्रॉडक्‍ट बनेल आणि त्यावरून अस्थैर्य व हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती या लघुपटात वर्तवण्यात आलीय. जॅकी भगनानी याने या कृत्रिम हृदय असणाऱ्या माणसाची भूमिका साकारलीय; तर नवाझुद्दीनने मंगळावरच्या माणसाची भूमिका साकारली आहे. यशपाल शर्मा ऑक्‍सिजन स्मगलर; तर प्राची देसाई परीच्या भूमिकेत आहे. या लघुपटाच्या माध्यमातून खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही शॉर्ट फिल्म यू-ट्युबवर नुकतीच प्रदर्शित झालीय. तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय...

मनोरंजन

मुंबई  : कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सगळेच उत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जातात. सरस्वतीवर कोणतेही संकंट आले असो पण...

02.27 PM

मुंबई : कृष्णधवल चित्रपटांच्या काळात गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ चित्रपटांसह, राज कपूर, शम्मी कपूर यांच्यासोबतच्या...

01.42 PM

मुंबई : अखेर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाचे एक झगमगीत पान उलगडले. आज घटस्थापनेच्या दिवशी या चित्रपटात राणी...

01.21 PM