मीच हिरॉईन

मीच हिरॉईन

‘झांशीची राणी लक्ष्मीबाई’ यांच्यावर आधारित ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट येत आहे आणि कंगना राणावत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे. तसंच या चित्रपटात ‘पवित्र रिश्‍ता’फेम अंकिता लोखंडेही लक्ष्मीबाईंची मैत्रीण झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील पहिला लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत तिने स्वतःलाच या चित्रपटाची हिरॉईन म्हटलं आहे. ती म्हणते, ‘कंगना नव्हे; तर मीच या चित्रपटाची हिरॉईन आहे; तर कंगना या चित्रपटातील हिरो आहे. कंगना मला या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून लाँच करते आहे. आजकाल कोणाला लाँच करणं कठीण राहिलेलं नाही. पण योग्य प्लॅटफॉर्मवरून लाँच करणं महत्त्वाचं आहे. जसं कंगनाने मला ही संधी मिळवून दिली. मी झलकारी बाईची अत्यंत महत्त्वाची भूमिका या चित्रपटात करतेय. मी या चित्रपटासाठी खूप मेहनतही घेतेय.’ अंकिताच्या भूमिकेविषयी आता सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com