फॅमिलीसोबत धम्माल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कॅमेरा, ॲक्‍शन, ट्रेक, प्रवास, चित्रीकरणामुळे सातत्याने बिझी शेड्यूल्डच्या दुनियेपासून स्वतःला मनसोक्त वेळ मिळावा, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. असंच आता अभिनेत्री पूजा सावंत हिलाही वाटत आहे. कारण, सलग दोन वर्षांपासून ती चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. त्यामुळे स्वतःला आणि परिवाराला खास असा वेळ तिला देता आला नाही. या शेड्युल्डमधून सुटी घेऊन ती आता पूर्णवेळ कुटुंबीयांसमवेत मौज-मस्ती अन्‌ धमाल करणार आहे. तसेच, वाचन, मेडिटेशनवरही भर देणार आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्याची मजा काही औरच असते.

कॅमेरा, ॲक्‍शन, ट्रेक, प्रवास, चित्रीकरणामुळे सातत्याने बिझी शेड्यूल्डच्या दुनियेपासून स्वतःला मनसोक्त वेळ मिळावा, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. असंच आता अभिनेत्री पूजा सावंत हिलाही वाटत आहे. कारण, सलग दोन वर्षांपासून ती चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. त्यामुळे स्वतःला आणि परिवाराला खास असा वेळ तिला देता आला नाही. या शेड्युल्डमधून सुटी घेऊन ती आता पूर्णवेळ कुटुंबीयांसमवेत मौज-मस्ती अन्‌ धमाल करणार आहे. तसेच, वाचन, मेडिटेशनवरही भर देणार आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्याची मजा काही औरच असते. या आनंदी वेळेमुळे पुन्हा नव्याने काम करण्यास एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते, असं पूजाचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्पर्धेच्या युगात स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा, असा पूजाने सल्लाही दिला.

Web Title: manoranjan news pooja sawant family