फाळके फाउंडेशन पुरस्कार अनुष्का शर्माला जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिनयाबरोबर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे अनुष्काला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अनुष्काने विविध भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच, तिने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. निर्माती म्हणून ‘एनएच १०’ हा अनुष्काचा पहिला चित्रपट होता. तिने ‘फिलौरी’, ‘परी’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘सुई धागा’ या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे.

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिनयाबरोबर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे अनुष्काला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अनुष्काने विविध भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच, तिने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. निर्माती म्हणून ‘एनएच १०’ हा अनुष्काचा पहिला चित्रपट होता. तिने ‘फिलौरी’, ‘परी’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘सुई धागा’ या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. अनुष्काने २००८ मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते.

Web Title: manoranjan phalke foundation award go to anushka sharma