हरियाणवी लावण्य 

भक्ती परब 
बुधवार, 28 जून 2017

मिस इंडिया 2017 चा किताब पटकावणाऱ्या मानुषी चिल्लर हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.

हरयानाच्या मातीत खेळाडू जन्माला येतात. तशा लावण्यवतीही. मानुषीच्या रूपात हरयानाला लावण्यवतीचं राज्य, अशीही ओळख आता मिळतेय. मेडिकल स्टुडंट असलेल्या मानुषीविषयी आता सगळ्यांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. भारताचं मिस वर्ल्डसाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या मानुषीबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का? मानुषीने शाळेत असल्यापासून कित्येक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

तिने काही जाहिरातींमधूनही काम केलंय. ती नियमित जिममध्ये जाते. एकही दिवस चुकवत नाही. तिला फिट राहायला आवडतं. ती समाजकार्यातही भाग घेते. मानुषीला फिरण्याची खास करून भटकंती करण्याची प्रचंड आवड आहे.