मराठी कलाकारांनीही दिला 'एक मराठा लाख मराठा'चा नारा

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

अभिनेत्री पूजा सावंतनेही एक मराठा लाख मराठाचा नारा दिला आहे. आदल्या दिवशीपासूनच तिने मराठी मोर्चा उद्या मुंबईत असल्याचे टि्वट केलं आहे. तर आज सकाळपासून मराठी क्रांती मोर्चासंबंधी अनेक टि्वटना तिने रिट्विट केलं आहे. उद्या मोर्चा मुंबईत या तिच्या ट्विटला 251 रिट्विट आणि 668 लाईक्स आले आहेत. 

मुंबई: आज मुंबईमध्ये भगवा रंग अवतरला आहे. लाखो मराठा बांधव आपल्या मागण्या घेऊन मुंबापुरीत दाखल झाले आहेत. सर्व माध्यमांमध्ये सध्या या विराट मोर्चाचं वार्तांकन केलं जाताना दिसतं. सध्या मुंबईमध्ये एक मराठा लाख मराठा हा नारा गरजत असताना सोशल मिडीयावरही सर्व वातावरण मराठामय झालं आहे. मराठाक्रांतिमोर्चा हा हॅशटॅगही ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसतं. याच पार्श्वभूमीवर अनेक मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही या मोर्चाला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा दिला आहे. 

अभिनेता हेमंत ढोमे याने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देताना, कोपर्डीच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबायलाच हव्यात हे निक्षून सांगितलं आहे. हेमंत ढोमे नेहमीच अने सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. त्याच्या या टि्वटला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद आला आहे. त्याच्या या पोस्टला 83 लाई्क्स आणि 35 रिट्विट्स मिळाले आहेत. 

अभिनेत्री पूजा सावंतनेही एक मराठा लाख मराठाचा नारा दिला आहे. आदल्या दिवशीपासूनच तिने मराठी मोर्चा उद्या मुंबईत असल्याचे टि्वट केलं आहे. तर आज सकाळपासून मराठी क्रांती मोर्चासंबंधी अनेक टि्वटना तिने रिट्विट केलं आहे. उद्या मोर्चा मुंबईत या तिच्या ट्विटला 251 रिट्विट आणि 668 लाईक्स आले आहेत. 

दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने केवळ एक मराठा लाख मराठाचा नारा दिला आहे. त्यालाही नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. या त्याच्या टि्वटला 48 रिट्विट आणि 134 लाईक्स मिळाले आहेत. ही पोस्ट करतानाच, त्याने एक रेखाचित्रही टाकलं आहे. 

यासोबत अभिनेता रितेश देशमुखनेही आपल्या टि्वटमध्ये एक मराठा लाख मराठाचा उल्लेख केला आहे. रितेशची अमाप लोकप्रियता लक्षात घेता या त्याच्या पोस्टला प्रतिसादही मुबलक मिळाला आहे. यावर 556 रिट्विट आणि शंभरावर कमेंटस आल्या आहेत. या पोस्टसोबत त्याने अश्वारूढ शिवरायांचा फोटोही त्यात टाकला आहे. तर आत्ता काही वेळापूर्वी सायलेंट स्ट्रेंथ म्हणून फोटो टाकला. 

यांसह सिनेसृष्टीतील अनेकांनी मराठी मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेकांनी या मुंबईतल्या मोर्चाचे फोटो व्हायरल केले आहेत. तर काहीनी रिट्विट करून आपला पाठिंबा दर्शवला आहे.