प्रभासला येतात मॅट्रीमोनीकडून ऑफर्स!

Prabhas
Prabhas

'बाहुबली' फेम प्रभास हा बाहुबलीच्या दोनही चित्रपटांमुळे देशात काय तर, जगात गाजला. प्रभासने चित्रपटप्रेमींची मनं जिंकलीच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा बॅचलर अभिनेता लाखो तरूणींच्या दिलाची धडकन बनला. त्याच्या याच दरम्यान प्रभासला अनेक जाहीरातींसाठी विचारले गेले. पण सर्वात जास्त मागण्या या विवाहसंस्थेच्या (मॅट्रीमोनी) जाहीराती करण्यासाठी आल्या आहेत. त्यामुळे प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

प्रभासच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मोठ-मोठ्या विवाहसंस्था या प्रभासला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवू इच्छितात. दोन विवाहसंस्थांनी आतापर्यंत तशी विचारणादेखील केली आहे व ते जाहीरातीसाठी सर्वाधिक किंमत द्यायला तयार आहेत. मजेशीर बाब म्हणजे 'बाहुबली : द बिगनिंग' व 'बाहुबली: द कनक्लूजन' या दोनही चित्रपटा दरम्यान प्रभासला विवाहासाठी खरच खूप मागण्या येत होत्या व या मागण्या देशातून तसेच विदेशातून देखील येत होत्या. पण इतकं सगळं असून प्रभासने अजूनही कोणत्या विवाहसंस्थेसोबत जाहीरात करण्याचा निर्णय घेतला नाही, पण लवकरच तो या जाहीरातींमध्ये दिसण्याची शक्यता आहे.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com