supremecourt
supremecourt

प्रिया वारियरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली : काही तासांतच सोशल मीडियावर फेमस झालेल्या प्रिया प्रकाश वारियरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 'ओरू अदार लव्ह' या चित्रपटातील 'मानिक्य मलरायी पूवी' या गाण्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यांवर स्थगिती आणली असून प्रियाला व चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील सुनावणीपर्यंत प्रियावर कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मार्चला होईल. 

हे गाणे प्रकाशित झाल्यानंतर 14 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये एका समुहाने या गाण्याविरूद्ध तक्रार नोंदवली होती. या गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पोलिसांनी चित्रपट दिग्दर्शक उमर लुलु यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर निर्मात्यांनी व प्रिया प्रकाश वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 

याचिकेत त्यांनी सांगितले की या प्रकरणात त्यांचे भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. या याचिकेत असेही म्हटले आहे की, केरळमधील 1970 पासून हे मूळ गाणे केरळमधील स्थानिक संस्कृतीचा एक भाग होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com