जॅकी-सलमान थायलंडच्या जंगलात 

jacqueline-fernandez & salman khan
jacqueline-fernandez & salman khan

जॅकलीन आणि सलमान यांची सिझलिंग केमिस्ट्री आपल्याला "किक' या चित्रपटात पाहायला मिळालीच; पण त्यांची ही केमिस्ट्री नुकत्याच चित्रित झालेल्या "रेस 3' मधल्या गाण्यामध्येही दिसणार आहे. त्यांच्या या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालंय आणि आता ते दोघे निघालेत थायलंडच्या जंगलामध्ये. हे दोघे थायलंडच्या जंगलात 10 दिवस चित्रीकरण करणार आहेत. चित्रपटाच्या क्‍लायमॅक्‍समधील ऍक्‍शन सिक्वेन्स तिथे चित्रीत केला जाणार आहे. दिग्दर्शक रेमो डिसुजाने त्यांच्या दहा दिवसांचे पूर्ण शेड्युल आखले आहे. जॅकलीनने गेले चार महिने हा सिक्वेन्स करण्यासाठी कसून तयारी केलेली आहे. तिने यासाठी मिक्‍स्ड मार्शल आर्ट, जिऊ जितसू, बॉक्‍सिंग, किक बॉक्‍सिंग, थाय बक्‍सिंग, इलेक्‍ट्रिक मसल स्टिम्युलेशन याचं खास ट्रेनिंग घेतलं आहे. या चित्रपटाचं ऍक्‍शन दिग्दर्शन अनल अरासु करत आहेत. या सीक्वेन्समध्ये किक बॉक्‍सिंग, हॅण्ड टू हॅण्ड कॉम्बॅट यांसारखे दमदार स्टंट्‌स आहेत. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी फिल्म्स या बॅनरची निर्मिती असलेला हा चित्रपट 2018 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. जॅकलीनची एवढी तयारी असताना प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, हे निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com