परीक्षा..कॉलेज..हॉस्टेल..सगळ्यांचं 'बारायण'

Marathi News Entertainment News Barayan Movie Trailer esakal facebook Live
Marathi News Entertainment News Barayan Movie Trailer esakal facebook Live

पुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने  'बारायण'च्या टीमने 'ई सकाळ'शी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.   

शिक्षणाचे बाजारीकरण, मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांची अति काळजी, भोंदुगिरी, अशा विविध मुद्द्यांवर अतिशय रंजक आणि खोचक पद्धतीने दिग्दर्शकाने प्रकाश टाकला आहे. बारावीची टक्केवारी खरंच आयुष्य बदलवणारे वळण आहे का? पालक इयत्ता आठवी पासूनच बारावीच्या परीक्षेची युद्धपातळीवर तयारी करून घेतात आणि मग घराघरात 'बारायण' सुरु होते. यावर अतिशय खुमासदार शैलीत दिग्दर्शक दिपक पाटील यांनी भाष्य केले आहे.

'बारायण' मध्ये अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे आणि त्यासोबत अभिनेते नंदू माधव बाबांच्या भूमिकेत, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भूतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा-संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना, संगीतकार पंकज पडघन यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. बऱ्याच वर्षानंतर अलका याग्निक यांचा आवाज मराठी गाण्याला लाभला आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो डिरेक्टर म्हणून काम केलेले आहे.

फक्त विद्यार्थ्यांनी नव्हे तर पालकांनी देखील आवर्जून बघायला हवा असा ‘बारायण’ हा चित्रपट थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात देखील दाखविला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com