माधुरीचा परफॉर्मन्ससाठी एवढा मोबदला? 

माधुरीचा परफॉर्मन्ससाठी एवढा मोबदला? 

'स्टार स्क्रीन ऍवॉर्डस 2017' मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपला जबरदस्त परफॉर्मन्स 'तम्मा-तम्मा' सह मंचाला अक्षरश: आग लावली. तिच्यासोबत हे लोकप्रिय गीत पुन्हा साकारण्यासाठी मंचावर तिच्यासोबत वरुण धवनही होता. असं ऐकिवात आहे की माधुरीला तिच्या पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीने या परफॉर्मन्सला तयार होण्यासाठी थोडा वेळ घेतला; पण अखेर चर्चेनंतर ती तयार झाली. 

माधुरी आणि वरुण यांनी आपल्या मनोरंजनाने भरलेल्या परफॉर्मन्ससह मंचावर धूमधडाका केला आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अर्थातच, हा परफॉर्मन्स मोबदल्याच्या तोडीस तोड होता. 

अश्‍विनीची नवं नाटकं 
शिक्षण घेत असतानाच एका कार्यक्रमातील नृत्य पाहून 'सांज सावल्या' या मालिकेत अभिनयाची संधी मिळालेली अभिनेत्री अश्‍विनी कुलकर्णी आता 'ढाई अक्षर प्रेम के' या नाटकात भूमिका रंगवीत आहे. यापूर्वी तिने मराठी, इंग्रजी तसेच भोजपुरी चित्रपटांसह हिंदी व मराठी मालिका आणि 'लग्नाची बेडी', 'माझी बायको, माझी मेहुणी', 'एक राणी दोन गुलाम' या नाटकांमध्येही अभिनय केला आहे. 

अश्‍विनी म्हणाली, '''ढाई अक्षर प्रेम के' हे नाटक व. पू. काळे यांच्या कादंबरीवर आधारित आहे. दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलं असून, मुक्ता बर्वे व सुजाता मराठे यांनी निर्मिती केली आहे. यामध्ये नातेसंबंधांवर भाष्य केलं आहे. यातील पात्र तुमच्या-आमच्यासारखी असल्यानं हे मानवी भावनांचा नक्कीच ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही.'' 

'रायझिंग स्टार'वर शंकर महादेवनचे पुनरागमन 
लाइव्ह रिऍलिटी शो 'रायझिंग स्टार'च्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये जगभरातील हजारो महत्त्वाकांक्षी हुशार गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वांत मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी एक संधी मिळावी म्हणून रांगेत उभे आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार-गायक शंकर महादेवन 'कलर्स'च्या रायझिंग स्टार या शोच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी छोट्या पडद्यावर पुर्नरागमन करणार आहेत. शंकर महादेवन यांच्यासोबत अभिनेते-गायक दिलजित दोसान्झ आणि भावगीतगायक मोनाली ठाकूरही असणार आहेत. 

याबाबत शंकर महादेवन म्हणाले, ''पहिल्या यशस्वी सीझननंतर हा शो भारताच्या पुढच्या 'रायझिंग स्टार'च्या शोधात दुसऱ्या सीझनसह परत येत आहे. यंदा आशा आहे की मला भारताच्या कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त गुणवान मुले प्रकाशझोतात आलेली पाहायला मिळतील. आता ही स्पर्धा जास्तच कठीण आणि स्पर्धात्मक होत चालली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com