चोवीस तासात 'पॅडमॅन' दोन कोटी लोकांपर्यंत

Marathi News Entertainment News Padman Trailer Akshay Kumar Radhika Apte Sonam Kapoor
Marathi News Entertainment News Padman Trailer Akshay Kumar Radhika Apte Sonam Kapoor

मुंबई - अक्षय कुमार लवकरच 'पॅडमॅन'च्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. 

चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली होतीच. गेल्या चोवीस तासात सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून 2 कोटी लोकांनी बघितला आहे. मासिक पाळी या बाउ केल्या जाणारा चित्रपटाचा विषय आहे. आपल्या समाजात आजही मासिक पाळीविषयी कमालीची गुप्तता पाळली जाते. मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरातील केवळ एक नैसर्गिक बदल आहे. ही साधी गोष्टं समजून न घेता लाज बाळगली जाते. जे फार दुर्दैव आहे. या सर्व मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.  

ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट आहे. सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यासाठी अरुणाचलम यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांना ते कशाप्रकारे सामोरे गेले याची कल्पना 'पॅडमॅन'चा ट्रेलर बघितल्यावर येतो. आर. बल्की यांनी 'पॅडमॅन'चे दिग्दर्शन केले आहे. तर निर्मिती ट्विंकल खन्ना यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com