...आणि ऊर्वशीला आलं रडू

Urvashi-Rautela
Urvashi-Rautela

ऊर्वशी रौतेलाचा "हेट स्टोरी 4' बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. यात ऊर्वशीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार, हे प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून दिसतच आहे. ऊर्वशी नावाप्रमाणेच तिने या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात "आशिक बनाया आपने' या गाण्याचा रिमेक केलेला आहे. ऊर्वशीचा या गाण्यावरचा डान्सही प्रेक्षकांनी पाहिला असेल; पण या चित्रपटात जेवढी ती सहज सुंदर दिसत्येय, तेवढीच मेहनत तिने या गाण्यासाठी घेतलीय. या चित्रपटात तिला हाय हिल्स घालून डान्स करायचा होता. त्यातही सगळ्या स्टेप्स परफेक्‍ट येणं गरजेचं होतं. डान्सचे बीट्‌स आणि को-डान्सर्सबरोबर स्टेपचा ताळमेळही बसवायचा होता. तिचे को-डान्सर्स परदेशी होते, त्यामुळे हिंदी गाण्याचे बोल समजून त्यांना डान्स करणं कठीण जात होतं. शेवटी 48 रिटेक्‍स होईपर्यंत ऊर्वशीने इतका घाम गाळलाय की शेवटी तिला आपलं रडू आवरता आलं नाही. पण तिच्या या मेहनतीला तिच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे, हे पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर आता नक्कीच हसू फुटलं असणार! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com