विराट कोहली-अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबद्ध

विराट कोहली-अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबद्ध

नवी दिल्ली : कित्येक महिने चर्चेत असलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे अखेर आज (सोमवार) विवाहबद्ध झाले. इटलीमधील मिलानमध्ये हा विवाहसोहळा झाला, असे 'फिल्मफेअर' या मासिकाने म्हटले आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील नात्याची चर्चा गेली काही वर्षे आहे. 2013 मध्ये एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान दोघांची भेट झाली. त्या दोघा दोघांनी अधिकृतरित्या नाते जाहीर केले नसले, तरीही कधी टाळलेही नव्हते. या दोघांच्या विवाहाची चर्चा यंदाच्या वर्षी जोरात सुरू होती. 

त्यातच, श्रीलंकेविरुद्धच्या कालपासून (रविवार) सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून आणि आगामी ट्‌वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतूनही विश्रांती देण्याची विनंती कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती. तसेच, चित्रिकरणात व्यग्र असलेल्या अनुष्कानेही डिसेंबरमध्ये सुटी देण्याची विनंती चित्रपट निर्मात्यांकडे केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. यामुळे डिसेंबरमध्येच या दोघांचा विवाह होणार, यासंदर्भात चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अनुष्का तिचे कुटुंबीय आणि गुरुजींसह इटलीला रवाना झाली होती. 

मिलानमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विराट-अनुष्काचा विवाहसोहळा झाला. येत्या 26 डिसेंबर रोजी मुंबईत विराट-अनुष्काचे 'रिसेप्शन' होणार असल्याची माहितीही मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com