झहीर-सागरिका अडकले विवाहबंधनात

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

येत्या 27 नोव्हेंबरला मुंबईतील ताज महाल पॅलेस अँड टॉवर येथे मोठ्या दिमाखात व थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडेल. लग्नानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : भारतचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे आज विवाहबंधनात अडकले. मुंबईत दोन्ही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी आज कोर्ट मॅरेज केले. येत्या 27 नोव्हेंबरला मुंबईतील ताज महाल पॅलेस अँड टॉवर येथे मोठ्या दिमाखात व थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडेल. लग्नानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.  
सागरिका-झहीरने काही दिवसांपूर्वीच त्यांचे नाते जाहीर केले होते. अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. अखेरीस दोन्ही परीवारांच्या साक्षीने आता ते विवाहबद्ध होत आहेत. या लग्नसमारंभाला क्रिकेट व बॉलीवूडमधील सर्व मान्यवर हजेरी लावतील, त्यामुळे या विवाहसोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.    

Web Title: Marathi news zaheer khan & sagarika ghatge's marriage