'घाडगे अॅन्ड सून' फेम अक्षय परदेशातही लोकप्रिय 

Marathi News_Ghadge and soon_TV Serial_Akshay ghadage_Chinmay udrikar
Marathi News_Ghadge and soon_TV Serial_Akshay ghadage_Chinmay udrikar

मुंबई - कलर्स मराठीवरील 'घाडगे अॅन्ड सून' ही मालिका सुरु झाल्यापासूनच बरीच चर्चेत आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्रं लोकप्रिय झाले आहे. उत्तम कथानक, अभिनेते यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खिळवून ठेवते. 'घाडगे & सून' मालिकेमधील अक्षय घाडगे म्हणजेच सगळ्यांचा लाडका चिन्मय उद्गीरकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. चिन्मय त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून त्याच्या पत्नीसह बाली आणि दुबईला जाऊन आला. तिथे त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया त्याने शेअर केल्या ज्यावरून आपणं असे नक्कीच म्हणू शकतो कि, 'घाडगे अॅन्ड सून' मालिका आणि अक्षयचे पात्रं लोकांची मने जिंकत आहे.

चिन्मयला विचारले असता त्याने या त्याच्या परदेशी ट्रीपमध्ये आलेल्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया शेअर केल्या. तो म्हणाला, 'दुबईमध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने मी तिथे गेलो होतो. तिथे एक लहान मुलगी माझ्याजवळ धावत आली आणि म्हणाली अरे अक्षयदादा कियारा शिमलामध्ये आहे, तिला तिकडे शोध. तिने ज्याप्रकारे मी दिसताच माझ्याजवळ येऊन ही प्रतिक्रिया दिली. त्यामध्येच सगळं काही दडलेलं आहे. माझ्यासाठी हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी अनुभव होता. कारण, एका लहान मुलाने तुम्हाला तुमच्या पात्राच्या नावाने हाक मारणं हे खूप महत्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांनाच ही मालिका आवडते आहे, हे देखील मला कळालं'.

बालीत इंडोनेशियन मुलींनी चिन्मयला अक्षय या नावाने हाक मारली. एवढेच नाही तर 'घाडगे अॅन्ड सून' मधील एका एपिसोडविषयी देखील त्या चिन्मयशी सविस्तर बोलल्या. यावरुन  महाराष्ट्रातच नाहीतर 'घाडगे अॅन्ड सून' ही मालिका परदेशामध्ये देखील लोकप्रिय ठरली आहे.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com