राजस-आरोहीच्या नात्यात 'पावनी' दुरावा आणणार?

गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनीया मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्याविरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी पावनीची भूमिका साकारत आहे. या नव्या एंट्रीनं कुलस्वामिनी या मालिकेत नवं आणि रंगतदार वळण येणार आहे.

- 'पावनी'च्या भूमिकेत मीरा जोशीची 'कुलस्वामिनी'मध्ये एंट्री

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनीया मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्याविरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी पावनीची भूमिका साकारत आहे. या नव्या एंट्रीनं कुलस्वामिनी या मालिकेत नवं आणि रंगतदार वळण येणार आहे.

राजस आणि आरोही यांच्यातल्या नात्यानं सुवर्णा काकू अस्वस्थ आहे. काकूला या दोघांचा काटा काढायचा आहे. मात्र, कितीही कारस्थानं केली, तरी त्यात ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. रेणुका देवीच्या कृपेने अभय बरा झाला आहे. त्याला समजतं की खरं तर राजस आणि आरोहीचं लग्न झाला आहे. म्हणून आरोहीपासून दूर जाण्यासाठी अभय स्वतःला व्यवसायात गुंतवून घेतो. त्या दरम्यान त्याची भेट होते पावनीबरोबर. काही काळानं पावनी अभयची गर्लफ्रेंड असल्याचं सांगत देवधर कुटुंबात प्रवेश करते. पावनीच्या देवधर कुटुंबातील प्रवेशामागे अभयचा काही डाव आहे का, पावनी राजस आणि आरोहीच्या नात्यात काही दुरावा आणणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आपल्या विरोधात होत असलेल्या कारस्थानांना आरोही कशा पद्धतीनं सामोरी जाते, रेणुका देवी आरोहीला कशा प्रकारे सहाय्य करते, पावनीच्या येण्यानंतरही तिचं आणि राजसचं नातं कायम टिकून राहणार का हे जाणून घेण्यासाठी, पहा ‘कुलस्वामिनी’ सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!