हॉट मीरा जोशीनं सिनेमाच्या सेटवर चक्क पाटावर बसून घासली भांडी

मीरा जोशीचा 'सपनों की पाठशाला कहानी तारा की' हा लघुपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
Meera Joshi
Meera JoshiInstragram

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी(Meera Joshi) नेहमीच सोशल मीडियावर(Social Media) आपले स्टायलिश हॉट फोटो शेअर करताना दिसते. पण अशी अभिनेत्री जेव्हा भांडी घासायचं ट्रेनिंग घेते हे जेव्हा कळतं तेव्हा डोळ्याच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. तर ही सगळी खटाटोप मीरानं आपल्या नवीन लघुपटासाठी केली आहे. मीरा जोशीचा 'सपनों की पाठशाला कहानी तारा की' हा लघुपट (Short Film) लवकरच आपल्या भेटीस येत आहे. NCPIL च्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना प्रकर्षाने दर्शवणारा हा लघुचित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तारापूर या गावात जाऊन केले आहे. या लघुपटाविषयी बोलताना मीरा जोशी म्हणाली, ''गावाकडच्या महिलांचे राहणीमान बोलण्या - चालाण्याच्या पद्धती हे सर्व अभ्यास करून बघून काम करण्यात खूप मजा आली, नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच गावातील काही नवीन मैत्रिणी मला मिळाल्या. खेडे गावा मधल्या बायका जे काही करतात ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि अनुभवायला सुद्धा मिळाले''.

Meera Joshi
शहनाझ गिल नाराज; सलमानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा सोडण्याचा निर्णय?

या लघुपटाविषयी बोलताना मीरा जोशी पुढे म्हणाली,'' मला एक किस्सा सांगावासा वाटतो तो म्हणजे चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे जिथे मला पाटावर बसून भांडी घासायची होती, तो सीन शूट करताना कधी माझी साडी पाण्यात भिजायची तर कधी लोळायची. आपल्याला नेहमी किचन मध्ये ओट्या समोर उभं राहून भांडी घासायची सवय असल्याने माझी चांगलीच फजिती झाली होती, या वेळी तिथल्या एका महिलेने मला प्रत्यक्षात शिकवलं कि कसं पाटावर बसायचं, कसं भांडं धरायचं आणि घासायच...''

'Sapno ki Pathshala,kahani Tara Ki...'Shortfilm Image
'Sapno ki Pathshala,kahani Tara Ki...'Shortfilm ImageGoogle

''हा चित्रपट म्हणजे एक भावनिक व हृदयस्पर्शी कथा आहे. एका चांगल्या सरकारी योजनेवर भाष्य करण्यात आलं आहे. सरकार कडून नेहमीच समाज प्रबोधनाचे काम होत असते, मला सुद्धा या कामात खारीचा वाटा मिळाला याचा आनंद आहे. या चित्रपटामध्ये एक प्रेरणादायी गाणं आहे जे शूट करताना आम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पेटला होता. शिलाई मशीन वर काम करून आपले संसाराला हातभार लागेल म्हणून हा व्यवसाय म्हणून सुरू केला, मशीन चालवता येणे खूप महत्वाचे होते. माझ्या घरी आईला मी लहानपणा पासूनच मशीन चालवताना पहिले होते त्यामुळे मला त्याचे लहान पणा पासूनच धडे मिळाले होते, त्याचा शूटिंग च्या वेळी खूप फायदा झाला''.

Meera Joshi
कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ला लागलं ग्रहण; सोशल मीडियावर सिनेमाला विरोध

''माझा हा गावातील एक कार्यक्षम महिला साकारतानाचा पहिलाच अनुभव होता. या आधी शहरातील कॉलेज मध्ये शिकणारी मुलगी किंवा व्हिलन असेच पात्र साकारलेयत. निरागस,अतिशय मेहनती आणि नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी, काहीतरी स्वतःच्या स्वबळावर करून दाखवण्याची जिद्द असलेली अशी भूमिका पाहिलांदाच साकारायला मिळाली आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा अली. 'सपनोंकी पाठशाला' या लघु चित्रपटाचे दिग्दर्शन अमृतेश श्रीवास्तव आणि निर्माते दीपक शर्मा, कास्टिंग डायरेक्टर राज पांडे आणि प्रमुख भुमिकेत मीरा जोशी, सह अभिनेता मनीष शर्मा आहेत.

Meera Joshi
'Gandhi Vs Godse' वादात; राजकुमार संतोषी विरोधात मुर्दाबादच्या घोषणा

आपला नवरा गरीबी मुळे लोकांनी दिलेले जुने कपडे वापरतात, त्यांचे साठी आपण नवीन शर्ट घेऊन द्यावा, असे छोटेसे स्वप्न मनात ठेऊन त्या दिशेने सरकारी NCPIL च्या योजनांच्या मदतीने पुढे मार्ग काढत जाणारी ही एक साधी गावातील निरागस महिला आणि तिची कहानी यावर ही फिल्म आहे. हा लघु चित्रपट २९ मे २०२२ रोजी रात्री ७.५० वाजता आपल्या डीडी नॅशनल वर प्रदर्शित होणार आहे. नक्की बघा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com