भाजपला नको असलेला मर्सल चित्रपटातील हाच तो संवाद

मर्सल चित्रपटाचे पोस्टर
मर्सल चित्रपटाचे पोस्टर

मर्सल (mersal) या तमिळ चित्रपटातील एक संवाद भाजपला नको आहे म्हणून त्याला कात्री लावण्यात आली आहे. हा संवाद काय आहे याबाबत मोठी उत्सुकता लोकांमध्ये आहे. हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संवाद वाचा मराठीत...

चित्रपटाचा हिरो म्हणतो - ''सिंगापूरमध्ये 7% GST आहे, तिथल्या लोकांना सरकार मोफत आरोग्य सेवा पुरवते. पण भारत सरकार 28% GST घेते मग जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा का पुरवत नाही! का?
औषधांवर आपण 12 % टॅक्स देतो, पण दारूवर टॅक्स आकारला जात नाही! आपल्या सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसतात, त्यामुळं शेकडो मुलं दगावतात, का? चौकशी केल्यावर माहीत पडतं की 2 वर्ष सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या बिलाचे पैसेच दिलेले नसतात.

दुसऱ्या एका सरकारी दवाखान्यात डायलिसिस करताना 4 रुग्ण दगावतात, का? तर मध्येच वीज गेली म्हणून... लाज वाटली पाहिजे, आपल्या दवाखान्यात वीज गेल्यानंतर वापरण्यासाठी पॉवर बॅकअप नसतो... काचेत ठेवलेली (incubator) ठेवलेली लहान मुलं उंदीर चावल्यामुळे मृत्युमुखी पडतात... हालत अशी आहे की लोकांना सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची भीती वाटते.. ही भीती नाही, खाजगी दवाखान्यात लोक जावेत म्हणून केलेली गुंतवणूक आहे... ''

"या संवादामध्ये आपल्याला आक्षेपार्ह काही वाटत नाही. या घटना भारतात घडलेल्या आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. काही अपवाद असतात. समाजाचं चित्र कलेतून उमटत असतं. 'टॉयलेट' चित्रपटात 'सरकारची स्तुती' केली की ती कलाकारी असते, आणि चित्रपटात वास्तव दाखवलं की तो 'अपप्रचार' असतो असे भाजपला वाटत असावे. असली सेन्सॉरशिप आम्हाला मान्य नाही. कुणीही ती मान्य करू नये! चित्रपट हा काल्पनिक असतो, अशी पाटी/ सूचना दाखवली जाते आधी... तरी हे लोक त्याला विरोध करून कात्री लावत आहेत, हे विशेष!," अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com