बाप-लेक रुपेरी पडद्यावर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

हिंदी चित्रपटसृष्टीत डिस्को डान्सर म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत डिस्को डान्सर म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

यापूर्वी त्यांनी आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या "हवाईजादा' चित्रपटात काम केले होते. आता त्यांनी अनिल शर्माची निर्मिती असलेला "जीनियस' चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटातून त्यांचा मुलगा उत्कर्षही हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हे बाप-लेक रुपेरी पडद्यावर एकत्र दिसतील. या चित्रपटाची कथा बुद्धिमत्ता जास्त असणाऱ्या मुलाभोवती फिरते. मिथुन चक्रवर्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या भूमिकेत आहे. 22 मेपासून चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, या वर्षीच तो प्रदर्शित होईल.  

Web Title: mithun and utkarsh chakraborty his first movie