"मॉम' चित्रपट चार भाषांमध्ये 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

'इंग्लिश विंग्लिश'नंतर आलेला श्रीदेवीचा पहिला चित्रपट म्हणून ओळखला जाणारा "मॉम'चे दिग्दर्शन बोनी कपूर करत आहेत. झी स्टुडिओज्‌ची निर्मिती असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्यात श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याबद्दल बोनी कपूर म्हणाले, "हा श्रीदेवीचा 300 वा चित्रपट आहे. तिच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने फॅन्स तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषतः दक्षिणेकडील तिचे चाहत्यांना अधिक उत्सुकता आहे. त्यामुळे हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.' हा चित्रपट 7 जुलैला भारतात प्रदर्शित होणार आहे.