शंकर एहसान लॉय यांचा स्वरसाज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

'आरंभ' ही मालिका गेले अनेक दिवस चर्चेत आहे. मालिकेची भव्यता बघून सध्या चर्चेत असलेल्या बाहुबलीची आठवणही होत असेल. ही मालिका फक्त त्याच्या भव्यतेमुळेच नाही; तर त्यामध्ये काम करत असलेल्या कलाकारांमुळेही प्रभावी वाटतेय.

'आरंभ' ही मालिका गेले अनेक दिवस चर्चेत आहे. मालिकेची भव्यता बघून सध्या चर्चेत असलेल्या बाहुबलीची आठवणही होत असेल. ही मालिका फक्त त्याच्या भव्यतेमुळेच नाही; तर त्यामध्ये काम करत असलेल्या कलाकारांमुळेही प्रभावी वाटतेय.

रजनीश दुग्गल, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेची कथा "बाहुबली' या चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पण या मालिकेची आणखी एक खासियत म्हणजे या मालिकेचे पार्श्‍वगीत. या मालिकेचे पार्श्‍वसंगीत दिलेले आहे शंकर एहसान लॉय यांनी. तर या मालिकेचे पार्श्‍वगीत गायले आहे सिद्धार्थ महादेवन आणि महालक्ष्मी अय्यर यांनी. सिद्धार्थ महादेवनने याआधी "नच दे ने सारे' आणि "टुकुर टुकुर' ही दोन गाणी गायली आहेत; तर महालक्ष्मी अय्यरने "बोल ना हलके हलके', "देस रंगिला', "जय हो' अशी अनेक गाणी गायली आहेत.

या मालिकेचे शीर्षकगीत तुम्ही जेव्हा ऐकाल, तेव्हा खरंच एका युद्धभूमीवर असल्याचं जाणवेल. ही मालिका आहेच तशी. पुरातन काळातील द्रविड आणि आर्य या दोन समाजातील संघर्ष "आरंभ'मध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील राजेरजवाड्यांची शान, मोठमोठे सेट्‌स या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत. ऐतिहासिक मालिका तशा अनेक येतच असतात; पण या विषयावर कधीही मालिका बनलेली नव्हती. त्यामुळे ही मालिका सगळ्याच अनुषंगाने एक वेगळी ऐतिहासिक मालिका ठरणार आहे.