विवाहित महिलांसाठी "मिसेस भारत आयकॉन' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

मिस इंडिया, मिस वर्ल्ड अशा स्पर्धा आपण सगळीकडेच पाहतो, पण आजपर्यंत लग्न झालेल्या महिलांसाठी अशा संधी उपलब्ध झालेल्या नव्हत्या. लग्न झालेल्या महिलांनाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रॉयल हेरिटेजचे चिफ मॅनेजिंग डारेक्‍टर अखिल बन्सल यांनी "मिसेस भारत आयकॉन' ही स्पर्धा सुरू केली.

या स्पर्धेची पत्रकार परिषद अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकतीच झाली. त्यावेळी अखिल बन्सल यांच्यासह मॉडेल ऍलेसिया राऊत, अभिनेत्री शिबानी कश्‍यप, डॉ. अनिल मुरारका, ब्राईटचे योगेश लखानी, डिझायनर अर्चना खोचर उपस्थित होते. ऍलेसिया या सगळ्या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत, ही स्पर्धा 1 जुलैला होणार आहे.