आता अमेरिकासुद्धा चाखणार ‘मुरांबा’!

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या ‘मुरांबाने’ महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगलेला असतानादेखील पुण्यात अनेक ठिकाणी ‘मुरांबा’ चे शो हाउसफुल झाले होते. हा चित्रपट बघताना खूप काळानंतर एक गोड, कौटुंबिक चित्रपट बघितल्याचे समाधान मिळत आहे. आणि आता परदेशातील नागरिकांनादेखील हा गोड, कौटुंबिक सिनेमा अनुभवण्याचा आनंद घेता येणार आहे.

मुंबई : घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या ‘मुरांबाने’ महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगलेला असतानादेखील पुण्यात अनेक ठिकाणी ‘मुरांबा’ चे शो हाउसफुल झाले होते. हा चित्रपट बघताना खूप काळानंतर एक गोड, कौटुंबिक चित्रपट बघितल्याचे समाधान मिळत आहे. आणि आता परदेशातील नागरिकांनादेखील हा गोड, कौटुंबिक सिनेमा अनुभवण्याचा आनंद घेता येणार आहे.

ऑस्ट्रेलिया, स्वीडन येथील हाऊसफुल शो नंतर ‘मुरांबा’ येत्या ११ जून रोजी अमेरिका येथे प्रदर्शित होणार आहे. अमेरिकेमधील एकूण १० शहरांमध्ये या चित्रपटाच्या शो चे आयोजन करण्यात आले आहे. दशमी क्रिएशन्सचे मुख्य आणि चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांच्या अप्रतिम मार्केटिंग आणि वितरणाच्या नियोजनामुळे ‘मुरांबा’परदेशातदेखील पोहोचत आहे.

अमेय वाघ, मिथिला पालकर, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. खुसखुशीत संवाद, फ्रेश लुक, साधी, सरळ आणि तितकीच गोड अशी पटकथा यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात ‘मुरांबा’ यशस्वी झाला आहे.

मनोरंजन

पुणे : निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलेला बापजन्म हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सचिन खेडेकर...

09.03 AM

मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबईत होणाऱ्या १९ व्या 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस' म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हल'साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017