जोडीत जीव गुंतला... 

संकलन : भक्ती परब  
शनिवार, 8 एप्रिल 2017

एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला पाहून काय लक्ष्मी-नारायणाची जोडी आहे, असं म्हणण्याची आपली रीत आहे. "नच बलिये'चा आठवा सीझन नुकताच सुरू झालाय. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील दहा जोड्या सहभागी झाल्या आहेत. पण या दहा जोड्यांमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया, दीपिका कक्कर आणि शोएब हिंदी प्रेक्षकांमध्ये आणि मराठी प्रेक्षकांमध्ये सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती या जोड्यांची चर्चा आहे. इतरही बरीच मंडळी आहेत. बीबीसी वर्ल्डवाईडची निर्मिती असलेला यंदाचा हा आठवा सीझन खूप गाजेल, अशी चर्चा होती. पण पहिला एपिसोड पाहिल्यावर तसं काही वाटलं नाही.

एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला पाहून काय लक्ष्मी-नारायणाची जोडी आहे, असं म्हणण्याची आपली रीत आहे. "नच बलिये'चा आठवा सीझन नुकताच सुरू झालाय. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील दहा जोड्या सहभागी झाल्या आहेत. पण या दहा जोड्यांमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया, दीपिका कक्कर आणि शोएब हिंदी प्रेक्षकांमध्ये आणि मराठी प्रेक्षकांमध्ये सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती या जोड्यांची चर्चा आहे. इतरही बरीच मंडळी आहेत. बीबीसी वर्ल्डवाईडची निर्मिती असलेला यंदाचा हा आठवा सीझन खूप गाजेल, अशी चर्चा होती. पण पहिला एपिसोड पाहिल्यावर तसं काही वाटलं नाही. नच बलियेच्या पहिल्या सीझनमध्ये होती वो बात इसमें नहीं, असंच काहीसं झालंय. सातव्या सीझनमध्ये जो सावळागोंधळ झाला होता, त्यामुळे प्रेक्षकांची बरीच निराशा केली होती. हा डान्स रिऍलिटी शो खऱ्याखुऱ्या जोड्यांना घेऊन नाचण्याचा होता. मग पुढे पुढे सीझनमध्ये ही व्याख्याच शिथिल करण्यात आली. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोड्या, प्रियकर-प्रेयसीच्या जोड्या अशांना या शोमध्ये घेतल्याने या शोचं भवितव्य धोक्‍यात आलं. या वर्षी लग्न झालेल्या आणि लग्न लवकरच करणाऱ्या अशा जोड्या यात आहेत. पण तो चार्म कुठे दिसत नाहीय. सातव्या सीझनमध्ये अमृता आणि हिमांशु ही जोडी जिंकल्यामुळे या वर्षी सिद्धार्थकडे मराठी प्रेक्षक डोळे लावून बसलेत. विविध वाहिन्यांवर "कपल्स शो' होतात. त्या कपल्स शोमध्ये सहभागी झालेले कपल्स नंतर एकमेकांपासून वेगळे होतात. असा पायंडा "पॉवर कपल' या "सोनी' वाहिनीवरील शो ने घातला होता. तशी चर्चा नंतर बराच काळ सुरू होती. दिव्यांकाचं विवेकशी हे दुसरं लग्न आहे. तरीही तिची जादू छोट्या पडद्यावरून कमी झालेली नाहीय. इतर कपल्स शो च्या अनुभवावरून या शोमध्ये सामील झालेल्या जोड्या सलामत राहू द्या, अशी भाबड्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. कारण त्यांचा जीव या जोड्यांमध्ये गुंतलाय...