नदी वाहते Review Live - चित्रपटाला ई सकाळने दिले 4 चीअर्स

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अंती नदी.. तिचं विलोभनीय दिसणं.. हिरवागार परिसर आणि त्यातून रोरावणारं राजकारण हे सगळ या सिनेमात आहे. पण म्हणून हा सिनेमा उगाच डोकं दुखवत नाही. तो फक्त सांगत जातो.. शांतपणे. या सिनेमातली माणसंही आपल्यासारखीच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमाची व्हर्जिनिटी. हा सिनेमा स्वच्छ.. नितळ पाण्यासारखा आहे. यात दिग्दर्शकाने मांडलेले प्रश्न.. लोकांची दाखवलेली मानसिकता हे सगळं पाहायला हवं. हा सिनेमा नक्की पहा. तुम्ही आयुष्यात कधीतरी कुठल्या नदीच्या संपर्कात आले असाल.. तर हा चित्रपट प्रेक्षकांना भिडेल. 

पुणे :  बऱ्याच वर्षांनी संदीप सावंत दिग्दर्शित नदी वाहते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ हा दिग्दर्शक या विषयावर काम करतो आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक बनवलेल्या या चित्रपटाचे स्वागत तमाम मराठी जनांनी करायला हवं. नदी वाहते हा चित्रपट आपलं रंजन करतो. मजा आणतो. एक नदी किती छान चित्रित करता येईल ते दाखवतो. इतकंच नव्हे, तर आपल्याला आपल्या नदीची आठवण करून देतो. नदी.. आपल्या गावातून, शहरातून वाहणारी.. पण दुर्लक्षित झालेली नदी.. ही नदी पाहायलाच हवी. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत 4 चीअर्स. 

Riview #Live नदी वाहते.. 

ही गोष्ट अंती नदीची आहे. या नदीचा प्रवाह जवळपास 40 किलोमीटरभर आहे. वेगवेगळ्या गावातून ती वाहाते. आता या वाहत्या नदीवर वरच्या बाजूला धरण बांधण्यात येणार आहे. उद्योगाच्या नावाखाली टुरिझम पाॅईंट उभारला जाणार आहे. ही बाब खालच्या बाजूला असलेल्या लोकांना कळल्यावर पुढे त्याचं काय होतं तो नदी वाहते सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं. पण हा सिनेमा उगाच डोस देत नाही. सोप्या भाषेत आपल्याला आपल्या नदीची आठवण करून देतो. आपण आपल्या गावातली नदी पाहातो रोज. पण तिचं बोलणं आपण कधी एेकत नाही. खरंतर तिला तिचं म्हणणंही असतं. याची जाणीव करून देतो हा चित्रपट. 

अंती नदी.. तिचं विलोभनीय दिसणं.. हिरवागार परिसर आणि त्यातून रोरावणारं राजकारण हे सगळ या सिनेमात आहे. पण म्हणून हा सिनेमा उगाच डोकं दुखवत नाही. तो फक्त सांगत जातो.. शांतपणे. या सिनेमातली माणसंही आपल्यासारखीच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमाची व्हर्जिनिटी. हा सिनेमा स्वच्छ.. नितळ पाण्यासारखा आहे. यात दिग्दर्शकाने मांडलेले प्रश्न.. लोकांची दाखवलेली मानसिकता हे सगळं पाहायला हवं. हा सिनेमा नक्की पहा. तुम्ही आयुष्यात कधीतरी कुठल्या नदीच्या संपर्कात आले असाल.. तर हा चित्रपट प्रेक्षकांना भिडेल. 

(कॅमेरा : योगेश बनकर)

Web Title: Nadi wahate live review by soumitra pote esakal