तांत्रिक अडचणींमुळे नदी वाहते चित्रपटाचे आजचे शो रद्द

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

श्वास या चित्रपटामुळे राष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नदी वाहते हा चित्रपट आज म्हणजे 22 तारखेला प्रदर्शित होणार होता. प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण होती. संदीप यांनी अत्यंत विचाराने मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन ठिकाणीच सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुर्देवाने नदी वाहते चित्रपट शुक्रवारी चित्रपट रसिक पाहू शकणार नाहीत. स्क्रॅबल एंटरटेन्मेट यांच्याकडून झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे नदी वाहतेचे आजचे बरेचसे शो रद्द करावे लागले आहेत. शनिवारपासून ठरलेल्या वेळेत हा चित्रपट सर्वत्र दिसेल. 

पुणे : श्वास या चित्रपटामुळे राष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नदी वाहते हा चित्रपट आज म्हणजे 22 तारखेला प्रदर्शित होणार होता. प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण होती. संदीप यांनी अत्यंत विचाराने मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन ठिकाणीच सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुर्देवाने नदी वाहते चित्रपट शुक्रवारी चित्रपट रसिक पाहू शकणार नाहीत. स्क्रॅबल एंटरटेन्मेट यांच्याकडून झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे नदी वाहतेचे आजचे बरेचसे शो रद्द करावे लागले आहेत. शनिवारपासून ठरलेल्या वेळेत हा चित्रपट सर्वत्र दिसेल. 

याबाबत माहिती देताना या चित्रपटाचे वितरक अंकित चंदरामानी म्हणाले, 'स्क्रॅबलतर्फे हा चित्रपट सर्वत्र दाखवला जाणार आहे. परंतु त्यांनी जी फाईल काॅपी केली आहे ती करप्ट झाली आहे. त्यांनी ती एकच फाईल न पाहता सर्वत्र दिल्याने सर्वच ठिकाणी या करप्ट फाईल पोचल्या. त्यामुळे हे शो रद्द करावे लागले. शनिवारपासून सर्व शो दिसू लागतील.'

शो रद्द झालेली यादी खालीलप्रमाणे. 
पुणे - सिटीप्राइड कोथरूड व पिव्हिआर पॅव्हिलियन,
ठाणे, डोंबिवली, पनवेल व नाशिक 

सिटीप्राइड अभिरूची, पुणे येथील संध्याकाळच्या शो बद्दल अजून स्पष्टता मिळालेली नाही.  

सर्व ठिकाणी उद्या म्हणजे 23 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे शोज होतील.  

 

Web Title: nadi wahate shows cancelled due to problem esakal news